MBA केल्यानंतर काय करावं??? समजा एखाद्या MNC मध्ये मॅनेजरपदी राहून मस्त स्वतंत्र एसी केबीनमध्ये पाच सहा आकडी पगार घ्यावा, मस्त लोण्यासारखी चालणारी गाडी, मुंबई-पुण्यात मस्त आधुनिक सुविधांनी सुसज्ज आणि आकर्षक फर्निचर, इंटेरिअरने सजलेला फ्लॅट, हिरवळीवर दिमाखात उभी राहीलेली छोटेखानी टुमदार बंगली कम सेकंड होम... व्वा! नुसत्या विचाराने गुलाबी, गुबगुबीत, गोजीरवाणी सप्तरंगी स्वप्नं पापण्यांआडून रांगायला लागले ना??? आणि... मी म्हटलं नारळपाण्याची गाडी काढली तर कशी काय आहे आयडीया?? "काय भिकेचे डोहाळे!!!" अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया नक्कीच उमटतील नाही???
आजच्याच लोकसत्तेत वाचलंत का? अभिजीत कुलकर्णी यांनी एका आगळ्या मराठी (हो हे स्पष्टपणे नमूद करायलाच हवं!) MBA आंत्रप्रुनरची ओळख करून दिलेय... अविनाश इघे...! अर्थशास्त्र व्यवस्थापनातील मास्टर्स पदवी घेतल्यानंतर नाशिकातील या मराठमोळ्या तरूणाला वर नमूद केलेल्या गोंडस स्वप्नांनी गुदगुल्या करीत खुणावलं असेलही कदाचित! पण या स्वप्नांकडे धाडसाने दुर्लक्ष करून कमोडिटी बिझनेसांतर्गत "ग्रीन स्ट्रीट कार्ट" या डोळ्यांना सुखद गारवा देणार्या मस्त फ्रेश पिस्ता हिरव्या शेडमधल्या आधुनिक नारळपाण्याच्या गाड्यांचा ब्रँड सर्व शहरांत वसवण्याच्या मोठ्ठ्या स्वप्नाने आणि ध्येयाने त्यांच्या डोळ्यांनाच काय पण मेंदूलाही पार झपाटून टाकलेय!
आता या कार्टमध्ये वेगळेपणा काय तर आता कळकट कपडा मांडीवर टाकत अर्धवट गंजलेल्या कोयत्याने नारळ फोडत त्याचा वरचा टवका उडवताना "नारियलपानी"वाल्याकडून अर्धेअधिक पाणी खाली सांडत तुम्हाला कपड्यांना सावरत तो मोठ्ठा नारळ पेलण्याची कसरत करायला नको. या कार्टमधील मशिनच्या सहाय्याने वरचेवर नारळाला मस्तपैकी छिद्र पाडून त्यातील पाणी कार्टमधील एका छोट्या कंटेनरमध्ये टाकायचं आणि अवघ्या ५ सेकंदांमध्ये थंडगार, स्वच्छ, गोड नारळपाणी तुमच्यापुढे हजर!!! आणि पुन्हा कागदाच्या ग्लासमधून त्यामुळे पर्यावरणासाठी आणि तुमच्यासाठीही सुरक्षित!! आहे की नाही अभिनव कल्पना...! उन्हाळी सुट्ट्या पण सुरू होतीलच लवकरच! त्याच्या आतच सुर्योबांनी आपल्या तप्त झळांचे किरणदूत फैलावण्यास सुरूवात केलीच आहे! तर नारळपाणी हा आयुर्वेदाने सुचवलेला आरोग्य आणि सौंदर्यवर्धक थंडगार आणि चवदार उपाय या उन्हाळ्यावरचा अक्सीर उतारा म्हणून होऊ शकतो.
सध्या नाशिकधल्या काही महत्त्वाच्या नाक्यांवर, चौकांमध्ये सध्या कोकोनट एक्स्प्रेस दिसू लागल्या असून त्याला पहिल्याच टप्प्यात अपेक्षेहून चांगला प्रतिसाद असल्याचे अविनाशकडून समजल्याचे लोकसत्ताच्या अभिजीत कुलकर्णी यांनी लेखात नमूद केले आहे. या कोकोनट एक्प्रेसचं वेगळ्या पद्धतीने ब्रँडींग करण्यासाठी या गाडय़ांवर उभे राहून सेवा देणाऱ्या तरुणांसाठी विशिष्ट रंगाचा टी शर्ट आणि टोपी असा ड्रेस कोडही अविनाशने निश्चित केला आहे. गजनीच्या ब्रँडींगसाठी सिनेमॅक्सच्या स्टाफला खास गजनी कट ठेवण्यास सुचवणार्या परफेक्शनिस्ट आमीरचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलाय वाटते...!
थोडक्यात काय, कायमस्वरूपी नोकरी, महीना अखेरीस निश्चित स्वरूपाचा पगार आणि गुंतवणूकीचे, घराचे हप्ते फेडून गाठीला पै पै जोडून गंगाजळी जोडणारे सुरक्षित स्वप्न पाहणार्या मराठी माणसाने कल्पनेचे गरूडपंख लावत मोठ्या स्वप्नांच्या जोरावर बिझीनेस स्पर्धेच्या अवकाशात झेप घेतली आहे... ही तर सुरूवात आहे... येत्या काळात त्या त्या ठिकाणच्या स्थानिकांना व्यवसाय संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून अन्य शहरांमध्ये देखील ग्रीन कार्टची साखळी निर्माण करण्याचा अविनाशचा मानस असल्यामुळे भविष्यात उच्चशिक्षित बेरोजगार तरूणाने संधी उपलब्ध नाहीत हे कारण देण्यापूर्वी स्वयंरोजगाराचा हा मार्ग नक्कीच पडताळून पाहावा.
माझ्या बाबतीत म्हणाल तर... "पातळ मलईवालं नारळपाणी दे..." (हो! सुरूवातीला मराठीच बोलून बघते... समजतंय का ते!) असं म्हटल्यावर पातळ मलई (लुसलुशीत साईसारखं खोबरं हे फारच डोक्यावरून जाईल ना!) म्हणजे काय ते अण्णा किंवा भैय्याच्या गाडीसमोर घसा आणि डोकंफोड करत बसायला नको!!! :)
संदर्भः ["पहिला फोटो लोकसत्ता १४-३-२०११ च्या अंकातून साभार] "
१४-३-२०११च्या लोकसत्तामधील अभिजीत कुलकर्णी यांचा "रस्त्यावर उतरुन ‘एमबीए’ अविनाश बनला नारळ पाणीवाला!" लेख!

1 comments:
Job with social work opportunity. We are provide village level technology. So we are recruiting 'COORDINATOR' please call -;7798191319 only serious person.
Post a Comment