मुंबई - उत्फुल्ल चैतन्याची! सळसळत्या नवतारूण्याची, उमेदीची, जिद्दीची, कर्तृत्वाची!! आकर्षक रंगांची, मनमोहक सुगंधांची!! खळखळून हसण्याची, भरभरून जगण्याची!! नवनवीन ट्रेण्ड्सची, विविध फॅशनची!! मुंबई - यंगीस्तानची!!!
लिवाईस, पेपे इत्यादी ब्रँण्ड्सबद्दल चोखंदळ असलेले मुंबई यंगीस्तान तितक्याच उत्साहाने आणि उत्सुकतेने फॅशनस्ट्रीटवरही शॉपिंग करतात. तसेच चटपटीत चाट आवडीने चाखणार्या या मुंबई यंगीस्तानने वि...विध "खाऊब्रँण्ड्स"नासुद्धा आपले फ्रेंण्ड्स बनवले आहे. मकडी उर्फ मॅकडी उर्फ मॅकडोनल्ड्सचे बर्गर्स, पफ्स, सोनेरी फ्राईज, पिझ्झाहट व डॉमिनोजचे एक्स्ट्रा चीज पिझ्झाज... "पार्टी करनेवालोंको पार्टी का बहाना चाहीये". डेलिशिअस हँडी मेन्यू, होम डिलीव्हरी, सोबतीला चिल्ड कोल्ड्रिंक्स आणि धिंगाणा घालणारा मित्रपरीवार असेल तर सेलिब्रेशनसाठी वेगळा बहाणा कशाला? एकत्र जमलो की पार्टीमूड आपोआपच येतो!
घरात बोअर होतंय? तर मग मित्रांसोबत चिलआऊट करायला बरीस्ता वा सीसीडी आहेतच की! न संपणार्या गप्पा, धम्माल खेचाखेची आणि सोबत गंधाळलेली वाफाळती कॉफी.... अन तोंडात विरघळणार्या मुलायम यम्म्म्म्म्म्म्म्म्म्म पेस्ट्रीज!!!
बर्थ डे आहे तर केक हवाच राव! पण आता केक खाण्यासाठी बर्थ डेजची वाट कशाला बघायची? लुसलुशीत केक्सचे स्मॉल व्हर्जन्स असतात ना माँजिनीजमध्ये... तितकेच डिलीशियस, तितकेच यम्मी क्रिमी!!
ऊऊऊऊऊऊ स्पाईसी लव्हर्स!! तंदूरी आणि ज्युसी कबाब्ज तुमच्यासाठीच! इटालियन, चायनीज, कॉन्टीनेन्टल... टेस्ट बड्स कमी पडतील पण चवी??? अहं!!! मॅकरोनी, स्पघेटी, पास्ताज, नूडल्स, टॅकोज आणि इतरही बर्र्च काही!! डाएट कॉन्शस असाल तर सँडविचेस त्यातही थोडा स्पाईस तो चलता है- तर ग्रील्ड! स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्
खरं तर इतर गोष्टींप्रमाणे चवीच्या बाबतीतही चोखंदळ असलेल्या यंगीस्तानला खाण्याचा तर एक बहाणा असतो... नाहीतर घरपोच मिळणार्या एक्स्ट्रा चीज पिझ्झ्याचे सहाच्या सहा पिसेस एकट्याने गट्टम करण्यापेक्षा खोक्यात उरलेला एकुलता एक पिझ्झ्याचा तुकडा, दोस्तांच्या नकळत गट्टम करण्यात आणि लागलंच तर शेअरिंगपेक्षा "जो माझा आहे तो माझाच आहे, जो तुझा आहे तोही माझा" असं हक्कानं म्हणत झगडण्याची जी वेगळीच लज्जत आणि खुमारी आहे ती त्या पदार्थाला अधिकच लज्जतदार खुमासदार बनवते आणि आयुष्यालाही!!!
...स्वप्नाली वडके तेरसे
0 comments:
Post a Comment