Posted by
स्वप्नाली वडके-तेरसे
हास्यरंग दिवाळी अंक २०१०-११ मध्ये पूर्वप्रकाशित!
हास्य-रहस्यएक विनोद काय करू शकतो? हसवू शकतो आणि काय??? अहं! हे तर अर्धसत्य झालं. एक विनोद तुमच्या बधीर संवेदनांना अलगद आंजारून गोंजारून तर कधी गुदगुल्या करून हलकेच फुलवतो, खुलवतो. तुमच्या सुप्त आशा आकांक्षांना पुनर्जागृत करतो. विनोद हा विजेच्या सौम्य झटक्यासारखा असतो. जो तुमच्या अंतरंगातील अणूरेणूत एक अनामिक पण उत्साही खळबळ माजवतो. हेच आहे हास्याचे सौंदर्य आणि हास्यरहस्य! नाही पटत? अं... थोडं अधिक विश्लेषण करूया हं.
विनोद ऐकल्यानंतर सर्वसामान्यपणे ऐकणार्
याची (आणि तो समजणार्
याची !) प्रतिक्रिया काय असते बरं? एरवी लांब चेहरा आणि आंबट तोंड करून बसणार्
या व्यक्तीच्या चेहर्
यावर हास्याचा वसंत फुलतो. इस्त्री फिरवल्याप्रमाणे गंभीर चेहरा करून आणि ओठांची झिप घट्ट आवळून वावरणार्
या शिष्टाच्या चेहर्
यावरील काही रेषा सुरकुत्यांप्रमणे हलकेच विलग होतात. एक विनोद हा मुखदुर्बळ व्यक्तीला त्या क्षणापुरता लौकिकतेचा वा प्रशंसेचा किरीट बहाल करतो. कल्पना करा, भाषणांच्या भाऊगर्दीत लंब्याचवड्या (बहुतांशी आत्मस्तुतीपर वा उपदेशपर) भाषणांनी सगळे पेंगुळलेत, काही तर चक्क स्थळकाळाची तमा न बाळगता जोरजोरात गोरू लागलेत तर काही प्रतिष्ठा जपणारे, अनावर होणार्
या जांभयांना त्या पूर्ण व्हायच्या आतच थोपवायचा निष्फळ प्रयत्न करत आहेत आणि अशा वेळेस एखादा वक्ता वावटळीसारखा अचानक यावा आणि वळवाचा पाऊस बरसावा तशी चुटकुल्यांची बरसात करून भाषण, समस्त श्रोतेगण आणि आजूबाजूचा मलूल परिसर नव्याने जीव फुंकून ताजातवाना आणि धंद करून जावा... काय? झोपी गेलेले सगळे खडबडून जागे होणारच नं? हीच तर ताकद आहे विनोदाची! विनोद तुमच्या आयुष्यात जागृती आणतो. कशी? तुम्हाला एखादा विनोद कान, दोळे, लक्ष एकवटून ऐकावाच लागतो. नाहीतर नेमकी पंचलाईनच मिस कराल! विनोदामधला एक शब्द जरी चुकवलात तरी त्याची सगळी मजा तुम्ही घालवलेली असेल. चुटकुला किंवा विनोद हा काही क्षणांचा... अवघ्या काही ओळींचा असतो. त्या क्षणापुरतं तरी तुम्हाला दुर्लक्ष करणं परवडण्याजोगं नसतं. हा विनोद तुम्हाला पुढचे काही क्षण गुदगुल्या करत खिदळत ठेवतो. अधूनमधून आठवून गुलाबपाण्याप्रमाणे आनंदाच्या तुषारांचा प्रसन्न शिडकावा करत राहतो आणि इतरत्र कुठे मित्रांच्या टोळक्यात किंवा फॅमिली फंक्शनमध्ये हा ऐकलेला (आणि बरोबर लक्षात ठेवलेला) विनोद सांगितलात तर तिथले वातावरण आपोआपच हलके फुलके बनवून तुम्हाला लोकप्रियतेचा सरताज घालतो वर हास्याची आणि प्रसंशेची दादही! आणि जर विनोद ऐकतानाच हा क्षण चुकवलात तर_?? तर तुम्हाला तो विनोद पूर्ण ऐकून हसणार्
यांपैकी कोणालातरी त्याच्या हास्याचा धबधबा थांबवून अतीव कुतूहनाने, याचक बनून "काय झालं, काय झालं?" असं विचारावं लागतं. त्या समोरच्याचा हास्यधबधबा आटेपर्यंत वाट बघावी लागते. त्याने आता शिळा झालेला तो विनोद घाईघाईत, थोडक्यात, गंभीरपणे सांगितल्यावर मग तुम्ही ब्रेक लागल्यासारखे हसता; तोपर्यंत बाकीचे तो क्षण उपभोगून आपापल्या कामाकडे परतलेले असतात! गेला ना तो क्षण वाया?
मैफिलीत हसण्यासारखी मजा नाही. एकेकटं हसण्यात कसली आलेय मजा? आणि "जाऊ दे, मला नाही असल्या पाचकळ गोष्टींमध्ये रस!" असं शिष्टपणे म्हणून तुम्ही तुमचं कुतूहल दाबून ठेवण्याचं काही काळ उसनं अवसान आणत असाल... तर मग मी म्हणेन तुम्ही फार्रSSच अरसिक बुवा!!! आणखी एक छोटुकलं रहस्य सांगू?? पांढर्
याशुभ्र दंतपंक्तींनी सुशोभित केलेल्या संपूर्ण चेहर्
याला उत्साहाने उजळवणारे प्रसन्न हास्य असणार्
या आणि चैतन्याने सळसळणार्
या माणसाकडे कोणीही आकर्षित होईल की चेहरा लांब ओढून बसलेल्या, निर्जीव बुब्बूळांची संवेदनाहीन नजर कुठेतरी लांबवर लावून आणि खांदे पाडून बसलेल्या, एरंडेल प्यायल्यासारखे आंबटढाण तोंड करून बसलेल्या दु:खी आत्म्याकडे... हे तुम्हीच सांगा! विनोद हा नेहमीच तार्किक असतो असं नाही. तो फारसा तात्विकही असत नाही आणि म्हणूनच मला विनोद आवडतो. विनोदाचे मूळ काम क्षणभराचा विरंगूळा! मोठमोठाले उपदेशाचे डोस पाजणे हे त्याचे कामच नव्हे! आणि जर पाजायचेच असतील असे उपदेशाचे डोस, तर ते विनोदाच्या शर्करेने अवगुंठीत असतील तर पचण्यास, गिळण्यास अधिक सुलभ, नाही का? काही विनोद अतार्किक असतात पण तरीही जाणकार त्यातून बरोब्बर तर्क काढून त्याचा हवा तो मतितार्थ समजावून घेऊ शकतात. खरं तर तार्किक विनोदाला खर्
या अर्थाने विनोद म्हणताच येणार नाही. विनोद हा अतार्कीक असला पाहीजे. का? म्हणजे असं बघा हं- दोन अधिक दोन असं समोरच्याने म्हणेपर्यंत तुम्हाला त्याचं उत्तर ठाऊक असतं- चार! शे दोनशे घालवून जेव्हा तुम्ही एखाद्या महागड्या थिएटरात एखादं पिक्चर बघायला जाता तेव्हा पुढच्या प्रसंगांचा इतकंच नव्हे तर थोड्याफार फरकाने संवादांचाही अंदाज येऊ देणार्रं सरळ्धोपट कथानक तुमचा सपशेल विरस करतं कारण ते कथानक तुम्हाला तीन तासांच्या घटकांचा विरंगूळा मिळवून देऊ शकत नाही. पण हेच जर कथानकामध्ये अनपेक्षित कलाटणी मिळत असेल आणि संवादांमध्ये जागोजागी शाब्दीक विनोदाचे पंचेस पेरले असतील तर तुम्ही एवढे फुटून फुटून हसाल की तुम्हाला खाली पडू की काय या भीतीने तुमची खूर्ची पकडून ठेवावी लागेल.
एखादा गंभीर चेहरा करून विनोद सांगतोय- तो विनोद आहे याची पूर्वकल्पना न देता! आणि तुम्ही मन लावून गंभीरपणे ते ऐकताय आणि मग अचानक अशी कलाटणी मिळते की ते समजून घ्यायला तुम्ही दोन सेकंदाचा अवधी (अर्थात ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार वाढीव) अवधी थबकता आणि मग जो हास्यकल्लोळ होतो की बस्स! तार्कीक, पुढचा अंदाज बांधू देणारी सरळधोपट वाक्य म्हणजे विनोद असू शकत नाही कारण तो तुम्हाला, तुमच्या पेंगुळल्या सुप्त गात्रांना जागृत कर नाही, तुमच्यात चैतन्याची पिचकारी मारत नाही. तर्क हा पुढे जाणारा असतो- एकेका पायरीवरून अंदाज बांधत पुढच्या पायरीकडे वळणारा! पण विनोद शेवटाकडून सुरूवातीकडे वळतो. पुढे काय असेल याचा तर्क बांधत असतानाच आधी गौप्यस्फोट होतो आणि मग हास्यस्फोट! आणि मग तुम्ही विचार करता अरे सुरूवात काय होती बरं? काय जादू आहे पाहा विनोदाची! प्रत्येक वाक्यागणिक तो तुम्हाला अधिकाधिक सावध करतो, तुमची उत्सुकता शिगेला पोहोचवतो आणि मग एखाद्या रहस्याचा उलगडा केल्यासारखी प्रसंगावर वरताण पंचलाईन! शेवटाबद्दल तुम्ही कदाचित काही अंदाज बांधलेही असतील पण हे अंदाज बर्
याचवेळेस चुकतातच कारण अतार्किकतेमुळे शेवट काय असेल हे शेवटपर्यंत फक्त तो विनोद सांगणार्
यालाच माहीत असतं आणि त्यातून तो विनोद सांगणारा अधिक संवादकुशल असेल आणि गंभीरपणे सुरूवात करून रहस्याने श्रोत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवत आवाजाचे योग्य चढउतार करत पंचलाईनची कलाटणी देण्यात पटाईत असेल तर मग काय आटीव दुधात केशरकांडीच म्हणायची! विनोद सांगणे हीसुद्धा एक कला आहे. शेवटपर्यंत उत्सुकता ताणत नेणे आणि मग अचानक रहस्याचा उलगडा केल्यासारखं दाखवणे आणि वाक्यागणिक श्रोत्यांच्या चेहर्
यावरील बदलणार्
या रेषा आणि भाव न्याहाळणे हा कार्यक्रमच मोठा रोचक असतो. त्यामुळे विनोद वाचण्यापेक्षा सांगणे आणि ऐकणे जास्त परिणामकारक ठरू शकते. कारण श्रोत्यांची समोरासमोर मिळणारी दाद आणि मित्र आप्तस्वकीयांच्या सहवासात उपभोगता येणारा निर्भेळ आनंद! यात वक्ता तर तो क्षण पुरेपूर उपभोगून घेत असतोच पण श्रोत्यांनाही त्याचा त्याहीपेक्षा जास्त आनंद मिळतो.
विनोद ऐकताना, अंदाजाच्या माड्या बांधत जाणं आणि मग अचानक समजणं की अरे खोलीचा दरवाजा तर दुसरीकडूनच होता! पण अंदाजाच्या या कोसळलेल्या माड्यांमुळे श्रोत्यांना दु:ख वगैरे होत नाही उलट अचानक कलाटणी मिळाल्यामुळे धक्का बसून त्याचा उगम हास्यात होतो आणि ऐकणारे "अर्रे, अस्सं होतं काय!" असं म्हणत त्या हास्यमैफीलीत सामील होतात. कलाटणीचा वैचारिक धक्का जेवढा अधिक, तेवढा हास्यस्त्रोत जास्त आणि खळखळता! आजूबाजूचा परिसर चैतन्याने उत्फुल्ल बनवणारा, प्रसन्नतेने हिरवागार बनवणारा, तुमचे नैराश्य व टेन्शन्स क्षणार्धात दूर पळवणारा, तुमच्यातील कार्यक्षमता वाढवणारा, वातावरणातील ताण कमी करणारा!! चेहर्
यावरची हास्याची एक वक्र रेषा सर्व वक्र गोष्टी सरळ करू शकते हेच ते हास्यरहस्य! म्हणून विनोद ऐकत राहा, वाचत राहा, सांगत राहा; "हास्यरंग" वाचत राहा; निर्मळ, निर्व्याज आणि निर्भेळ हसत राहा, हसवत राहा! [ म्हणजे मग टेन्शन्स दूर करण्यासाठी कृत्रीम हास्यासाठी मोठी रक्कम गुंतवून हास्यक्लबात जायही गरजच उरणार नाही...! खरं नं?]
Posted by
स्वप्नाली वडके-तेरसे
मराठीमाया मासिका मध्ये पूर्वप्रकाशित!
मन रिमझिम पावसाचे
मन हळव्या मोरपिसाचे
आसुसलेल्या चातकचोचीचेआसुसलेल्या चातकचोचीचे
मन संदेह काजळीचे
उतरू आलेल्या नभाचे
मन रिमझिम पावसाचे
उनकोवळ्या मखमली गालिच्याचे
मन धुंद मृद्गंधाचे
अंगभर पसरणार्
या गुलाबी गारव्याचे
मनमन झिम्माड पाऊसधारांचे
चिंब भिजणार्या पोरांचे
मन नवा रेनकोट, रंगीबेरंगी छत्री, नव्या दप्तराचे,
नव्याकोर्
या पुस्तकाच्या नव्याकोर्
या वासाच्या नवलाईचे
मन खळखळणार्
या उत्फुल्ल धबधब्याचे
भोवर्
याशी धीटपणे झुंजणार्
या कागदी होडीचे
मन ता
वदानाच्या काचेवरून ओघळणार्
या थेंबांचे
सप्तरंगी स्वप्नांच्या इंद्रधनुचे
मन हिरव्या तृणपात्यांचे
ओघळणार्
या आठव पागोळ्यांचे
मन पिसाटलेल्या पाऊसझडीचे
साचून राहणार्
या गढूळ पाण्याचे
मन नवसृजन्याचे
सृजन्याचे
अलवारपणे अंकुरणार्
या पालवीचे
मन, वार्
याने उलट होऊन फजिती करणार्
या छत्रीचे
कधी एकाच छत्रीत निम्मं निम्मं भिजणार्
या 'त्या दोघांचे'
मन साचलेल्या पाण्यात डोकावणार्
या तुकडाभर आभाळाचे
तळ्याच्या पाठीवर गुदगुल्या करणार्
या थेंबतरंगांचे
मन कष्टकरी शेतकर्
याच्या सृजन हातांचे
काळ्या आईच्या उबदार कुशीतून अंकुरणार्
या कोवळ्या बीजाचे
मन मूकपणे पाझरणार्या डोळ्यांतील पावसाचे
तळ्याकाठीऔदुंबराचे
मन कमलपत्रावर बसून डरावणार्
या आनंदी बेडकाचे
काळ्या मातीच्या गोधडीत शिवलेल्या हिरव्या चौकोनी तुकड्याचे
मन कपड्यांवर उमटलेल्या चिखलखडीच्या नक्षीचे
पहिल्या पावसातील तुझ्या नि माझ्या गुलाबी गुपीताच्या साक्षीचे
मन आठवणींच्या पिंजलेल्या कापसाचे
खोटा पैसा देऊन भुलवलेल्या एका पावसाचे!
Posted by
स्वप्नाली वडके-तेरसे
मायबोलीवर पूर्वप्रकाशितः मायबोलीबर इथे वाचता येईल.मदर्स डे पाठोपाठ येतो फादर्स डे.
"पापा कहते है बडा नाम करेगा
बेटा हमारा ऐसा काम करेगा..."
मुलाच्या जन्माच्याही आधीपासून आपली अधूरी स्वप्ने त्याच्या भविष्याच्या रूपाने पाहणार्या वडीलांबद्दल मुलाच्या मनात धाकाबरोबरच काहीशी अढीही असते. काळानुसार हा धाक आणि ही अढी मित्रत्वाच्या स्निग्ध नात्यामध्ये घोळून काहीशी साजूक बनली आहे.
पूर्वीच्या काळी वडील म्हणजे मूर्तीमंत दैत्य वाटत असे. ओसरीवर चपलांची चाहूल लागताच आत दंगा करणारी पोरेटोरे एकदम चिडीचिप होऊन जात असत. गरमागरम जेवणाचे घास बकाबक कोंबणार्या चुकार पोराला नुकतेच जेवून ओसरीवर वा झोपाळ्यावर विसावलेल्या अन ढेकराबरोबरच प्रगतीची पृच्छा करणार्या वडीलांच्या धाकाने दोन घास कमीच जात.
तिन्हीसांजा व्हायच्या आत घराकडे परतायचं असा अलिखित तेव्हा सर्वच बाळगोपाळांसाठी असायचा. मुलगा-मुलगी असा भेद तेथे नसे. मग दिवेलागणीची वेळ टळूनही एखादं पोरटं घरी परतलं नसेल तर त्याच्या वडीलांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरं कसं जायचं या विचाराने कावरीबावरी झालेली आई बिचारी अस्वस्थपणे येरझार्या घाले.
वडीलांच्या घरी यायच्या वेळेआधी पोरगं उगवलं तर वाचलं नाहीतर आधी त्याच्या काळजीने ओसरीवर अस्वस्थपणे येरझार्या मारणार्या बापाच्या अंगात क्रोधपिशाश्चाचा संचार कधी होईल ते कळतही नसे आणि मग वडीलांच्या क्रोधताडनाच्या तडाख्यातून पोराला वाचवण्यासाठी आईची कोण तारांबळ उडे...

कोणीही न शिकवता अवचित ओठी येणार्या बाप रे! मध्ये बापाचा धाक आणि आई गं! यात आईचं कळवळणारं ह्रदय दडलेलं असतं.
ठेच लागल्यानंतरच्या वेदनेसह अस्फूट बाहेर पडणारे "आई गं!" शब्द हळूवार फुंकर घालून त्या वेदनेची ठसठस कमी करतात तसंच भीती वाटल्यावर आपसूक निघणारे "बाप रे!" हे शब्द त्या भीतीमधून धीर देणारा बाबांचा हात डोक्यावरून अलगद फिरवतात.
आईच्या वात्सल्याविषयी, ममतेविषयी साहित्यिकांनी विपुल साहित्यनिर्मिती केली आहे, त्यामानाने बाबा हा प्राणी काही अंशी दुर्लक्षितच राहीला आहे. साहित्यिकच कशाला सर्वसामान्यपणे बाबा या व्यक्तीकडे पाहण्याचा समाजमानसाचा दृष्टीकोन - कुटुंबाच्या चरितार्थ अर्थार्जन करणे आणि वेळप्रसंगी कुटुंबाचे संरक्षण करणे एवढाच मर्यादित आहे. समाजाच्या या दृष्टीकोनाने बापाला कुटुंबप्रमुखाचं बिरूद मिरवण्यासाठी जरी चिकटवलं असलं तरी प्रेमाच्या भावभावनांच्या ओलाव्यापासून काहीसं अलिप्तच ठेवलं गेलंय.
वास्तविक आई जेव्हा तुम्हाला जन्माला घालत असताना अतीव वेदनांशी झुंजत असते तेव्हा तेवढ्याच अस्वस्थपणे काळजीने बाहेर येरझार्या घालणारा बापच असतो. तेव्हा बापाच्या धाकाच्या मागे लपलेलं अपार प्रेम, काळजी तुम्हाला जाणवत नाही.
तुमच्या शिक्षणासाठी काबाडकष्ट करून स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन तुम्हाला सर्व सुखसोयी उपलब्ध करून देणारा बापच असतो... पण ते तर बापाचं कर्तव्यच असतं अशा स्वर्थी विचारामुळे बापाचं प्रेम तुमच्यासाठी अगम्यच राहतं.
आपली स्वप्ने आपल्या मुलांच्या रूपाने पूर्ण होण्याची आस बाळगणारा बाप असतो पण ते तुम्हाला त्याच्या अपेक्षांचं जोखड वाटतं.
बापाच्या नजरेत तरळणारा तुमच्याविषयीचा अभिमान तुम्हाला जाणवतही नाही कारण तेव्हा तुम्ही उत्तरोत्तर प्रगतीची शिखरे सर करण्यात मग्न असता. मुलीच्या लग्नात मंगलाष्टका संपेपर्यंत डोळ्यांतील पाणी पापण्यांआड दडवून ठेवणारा, आणि मुलगी सासरी निघाली की मग लहान मुलासारखा ढसाढसा रडणाराही बापच असतो.. एरवी कोणाहीसमोर आपली मान न झुकवणारा पुरूष मुलीचा बाप असेल तर मात्र मुलीच्या सुखासाठी तो वेळोवेळी नमतं घेतो. सर्व वधूपिते हे सिंधूच्या बापाप्रमाणे दुर्लक्षित, उपेक्षित, उपकृत आणि केविलवाणे भासतात.
पण सुदैवाने आता परिस्थिती बदलू लागलेय. शिकलेल्या सिंधू आपल्या बापाला उपेक्षित न ठेवता योग्य तो मान मिळवून देऊ लागल्या आहेत. बापाच्या धाकाची जागा आपुलकी, मैत्री आणि सामंजस्य घेताहेत. वयाची आणि संवादाची दरी अस्पष्ट होऊ लागलेय. "अहो बाबा"ची जागा "ए बाबा"ने पटकावली आहे.
संदीप खरे यांनी आपल्या "दमलेल्या बाबाची कहाणी" या कवितेत समस्त मुंबईकर नोकरदार बाबांची कथा, व्यथा आणि हतबलता अतिशय तरल आणि भावूकपणे वर्णिली आहे की डोळ्यांच्या कडा ओलावल्याशिवाय राहत नाहीत.
लोकल ट्रेन्सचा गर्दीचा प्रवास, उशीरापर्यंतचं ऑफीसमधील काम या जंजाळात अडकलेला बाबा आपल्या चिमुकलीला वेळच देऊ शकत नाही मग तो या गाण्यातून चक्क तिची माफी मागतो. मुलगी आणि बाबांचं नातं हे खूप लाघवी आणि हळवं असतं. 'शब्दावीण संवादु' असावं तसं, अव्यक्त तरी खूप काही बोलून जाणारं! मुलीसाठी वडील हाच एकमेव आदर्श पुरूष असतो. मग ती आयुष्याच्या जोडीदारातही वडीलांच्या दिसण्याचं, वागण्याचं, व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब शोधू लागते आणि ज्या पुरूषात हे साधर्म्य आढळेल त्याला आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडते.
लग्नाळू मुलगी ही तिच्या वडीलांच्या दृष्टीने फार मोठी जोखीम असते. कधी एकदा मुलीला सुस्थळी आणि योग्य हाती सोपवतोय आणि आपण आपल्या या जबाबदारीतून पार पडतोय ही चिंता असंख्य वधूपित्यांना भेडसावत असते.
पण जसजसा लग्नाचा दिवस जवळ येतो तसतसा हाच वधूपिता हळवा होतो. आपल्या काळजाचा तुकडा दुसर्याच्या हाती सोपवतोय, ते तिला नीट वागवतील ना? इथल्यासारखा हट्ट तिने केला तर अल्लड समजून तिला माफ करतील ना? तिला इथल्यापेक्षा जास्त सुखात ठेवतील ना? या नव्या चिंता त्यांना भेडसावायला लागते आणि जेव्हा त्याला कळते की आपली मुलगी सासरी फार फार सुखात आहे तेव्हा त्या बापाला धन्य धन्य वाटते.
मुलगा वयात येऊ लागला की वडील त्याचा सगळ्यात जवळचा मित्र बनतात. त्याच्या शंकाकुशंका निरसन करणारा, त्याच्या मनातील संदेहांना त्याला समजतील अशा प्रकारे उत्तरे देणारा, त्याच्या अडचणी ऐकून आणि समजून घेणारा, त्यातून योग्य तो तोडगा सुचविणारा, त्याच्या नैराश्याच्या काळात उभारी देणारा, त्याची गुपितं शेअर करणारा, त्याचे आनंद द्विगुणीत करणारा, साम-दाम-दंड वापरून मुलाच्या घसरणार्या पाऊलाला सावरणारा... बाबाची अनेक रूपे आहेत.
जाहीरातींमध्ये मुलगा आणि वडील यांचं भावविश्व अप्रतिम साकारलेले आढळते. अप्सरा पेन्सीलच्या जाहीरातीतील वडील मुलाला शाळेतून घरी आणताना मुलाच्या नुकत्याच मिळालेल्या प्रगतीपुस्तकावरील गुणांची चर्चा करीत असतात. मुलगा गणितात १०० पैकी १०५ मिळाले असे सार्थ अभिमानाने सांगतो. वडील मिश्किलपणे उद्गारतात,"तुमच्या शिक्षिकेचं गणित जरा जास्तच खराब दिसतंय...". मुलगा मोठ्या आत्मविश्वासाने उत्तरतो, "किंवा माझं हस्ताक्षर जरा जास्तच छान आहे..."
"तुमचं हस्ताक्षर..." मुलगा मिश्कीलीने वडीलांना विचारतो आणि वडील त्याला लटके दटावतात. वडील आणि मुलगा यांच्यातील मित्रत्वाच्या नात्याचं अतिशय बोलकं उदाहरण!
अशाच एका कारच्या जाहीरातीमधील मुलाला एका विषयात खूपच कमी मार्क्स मिळतात. मुलगा हिरमुसतो. त्याला शाळेतून घरी घेऊन जाण्यासाठी गाडी घेऊन आलेल्या बाबांना मुलाचा हिरमुसलेला चेहरा पाहून वाईट वाटते. मग ते त्याची समजूत काढण्यासाठी एक छान क्लुप्ती काढतात. घरी जाण्याऐवजी त्याला एका लाँग ड्राईव्हवर घेऊन जातात आणि जाता जाता अवघड वाटणार्या त्या विषयावर चर्चा करून त्या विषयाचा बागुलबुवा घालवतात.
मुलगी आणि बाबा यावरील जाहीरातींमध्ये संदीप खरे यांच्या कवितेतील बाबाप्रमाणे हे वडीलही आपल्या मुलीला,"सासुरला जाता जाता उंबरठ्याम्ध्ये बाबासाठी डोळ्यांमध्ये येईल का पाणी..?" अशी पृच्छा करताना आढळतात.
खरंच बाप आणि मूल यांच्यामध्ये एक अव्यक्त अतूट हळवा बंध असतो, जो मुलाला आयुष्याच्या प्रवासात निरंतर साथ करतो... कधी संस्कारांच्या आणि तत्वांच्या रूपात, कधी खंबीर आधारवडाच्या रूपात, कधी घसरण्यार्या पाऊलाला सावरणार्या धाकाच्या रूपात तर कधी आदर्शांच्या रूपात!