काव्य : मन रिमझिम पावसाचे

मराठीमाया मासिका मध्ये पूर्वप्रकाशित!

मन रिमझिम पावसाचे

मन हळव्या मोरपिसाचे
आसुसलेल्या चातकचोचीचे
आसुसलेल्या चातकचोचीचे
मन संदेह काजळीचे
उतरू आलेल्या नभाचे
मन रिमझिम पावसाचे
उनकोवळ्या मखमली गालिच्याचे
मन धुंद मृद्गंधाचे
अंगभर पसरणार्या गुलाबी गारव्याचे
मन
मन झिम्माड पाऊसधारांचे
चिंब भिजणार्‍या पोरांचे


मन
नवा रेनकोट, रंगीबेरंगी छत्री, नव्या दप्तराचे,
नव्याकोर्या पुस्तकाच्या नव्याकोर्या वासाच्या नवलाईचे

मन खळखळणार्या उत्फुल्ल धबधब्याचे
भोवर्याशी धीटपणे झुंजणार्या कागदी होडीचे
मन तावदानाच्या काचेवरून ओघळणार्या थेंबांचे
सप्तरंगी स्वप्नांच्या इंद्रधनुचे

मन हिरव्या तृणपात्यांचे
ओघळणार्या आठव पागोळ्यांचे
मन पिसाटलेल्या पाऊसझडीचे
साचू राहणार्या गढूळ पाण्याचे

मन नवसृजन्याचेसृजन्याचे
अलवारपणे अंकुरणार्या पालवीचे
मन, वार्याने उलट होऊन फजिती करणार्या छत्रीचे
कधी एकाच छत्रीत निम्मं निम्मं भिजणार्या 'त्या दोघांचे'मन साचलेल्या पाण्यात डोकावणार्या तुकडाभर आभाळाचे
तळ्याच्या पाठीवर गुदगुल्या करणार्या थेंबतरंगांचे
मन कष्टकरी शेतकर्याच्या सृजन हातांचे
काळ्या आईच्या उबदार कुशीतून अंकुरणार्या कोवळ्या बीजाचे


मन मूकपणे पाझरणार्या डोळ्यांतील पावसाचे
तळ्याकाठीऔदुंबराचे
मन कमलपत्रावर बसून डरावणार्या आनंदी बेडकाचे
काळ्या मातीच्या गोधडीत शिवलेल्या हिरव्या चौकोनी तुकड्याचे
मन कपड्यांवर उमटलेल्या चिखलखडीच्या नक्षीचे
पहिल्या पावसातील तुझ्या नि माझ्या गुलाबी गुपीताच्या साक्षीचे

मन आठवणींच्या पिंजलेल्या कापसाचे
खोटा पैसा देऊन भुलवलेल्या एका पावसाचे!

0 comments:

Post a Comment